आज आपण बनवणार आहोत दिवाळीसाठी खास रसरशीत जलेबी!
ही जलेबी बनवणे अगदी सोप्पं आहे आणि स्वादाने भरपूर आहे. स्टेप-बाय-स्टेप सोबत पाहा आणि आपल्या दिवाळीला आणखी खास बनवा.

साहित्य:
साखर
पाणी
वेलची पावडर
केसर
कलर (ऐच्छिक)
मैदा – 1 वाटी
गगनगिरी तूप – 1 चमचा
इनो – 1/2 चमचा
तेल – तळण्यासाठी

कृती:
टोपामध्ये साखर आणि पाणी घालून गरम करा.
त्यात वेलची पावडर आणि केसर घाला.
थोडा कलर अॅड करून मिक्स करा.
बाऊलमध्ये मैदा, तूप आणि इनो मिक्स करा.
पाणी घालून बॅटर तयार करा.
जलेबी मेकरमध्ये बॅटर भरा आणि गरम तेलात गोल्डन ब्राउन तळा.
तयार जलेबी साखरेच्या पाकात डुबवा आणि सर्व्ह करा.

Search