मुलांच्या cheesy cravings साठी खास!
हेल्दी, टेस्टी आणि भरपूर पनीर व चीजने भरलेली चिझी चिझी पनीर टॅकोस रेसिपी — S.R. Thorat यांच्या गगनगिरी मलाई पनीरने बनवलेली.
घरच्या घरी बनवलेली सॉफ्ट चपाती, हलक्या भाजलेल्या भाज्या, मोजरेला चीज आणि मलाई पनीर — हे टॅकोस तुमच्या घरात रेस्टॉरंटची मजा आणतील!

साहित्य :
गव्हाचं पीठ – १ वाटी
मैदा – १ वाटी
तेल – २-३ टेबलस्पून
लाल व हिरवी शिमला मिरची – बारीक चिरलेली
हिरवे मटार – उकडलेले
गाजर – उभे पातळ काप
कांदा – पातळ चिरलेला
ग्रीन बीन्स – बारीक चिरलेले
हिरवी मिरची – बारीक चिरलेली
मीठ – चवीनुसार
काळी मिरी पावडर – ½ टीस्पून
टोमॅटो सॉस – २ टेबलस्पून
आलं-लसूण पेस्ट – १ टीस्पून
मॆयॉनीज – २ टेबलस्पून
मोजरेला चीज – आवश्यकतेनुसार
S.R. Thorat गंगागिरी मलाई पनीर – किसून (आवश्यकतेनुसार)
गगनगिरी बटर – १ टेबलस्पून

कृती :
गव्हाचं पीठ आणि मैदा एकत्र मळून मऊसर पीठ तयार करा आणि बाजूला ठेवा.
एका पॅनमध्ये तेल गरम करून कांदा, गाजर, ग्रीन बीन्स आणि हिरवे मटार टाकून परता.
त्यात हिरवी मिरची, मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून मिक्स करा.
आता लाल व हिरवी शिमला मिरची टाकून परतून घ्या.
टोमॅटो सॉस आणि आलं-लसूण पेस्ट टाकून एकत्र शिजवा.
मळलेल्या पीठाच्या चपात्या लाटून हलक्या भाजून घ्या.
चपातीवर टोमॅटो सॉस आणि मॆयॉनीज पसरवा.
त्यावर मोजरेला चीजची एक लेयर द्या, मग परतलेल्या भाज्यांची लेयर द्या, आणि किसलेलं गगनगिरी मलाई पनीर टाका.
पुन्हा हाच प्रोसेस करून वरून मोजरेला चीज टाका.
चपाती फोल्ड करून टॅकोच्या आकारात करा आणि पॅनमध्ये गंगागिरी बटर टाकून झाकण ठेऊन शॅलो फ्राय करा.
गरमागरम ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

Search