तोंडात टाकताच विरघळणारा रेस्टॉरंट स्टाईल मलाई पनीर कोफ्ता आता घरच्या घरी बनवा!

साहित्य

कोफ्त्यासाठी:
गगनगिरी मलाई पनीर – १ वाटी
उकडलेले बटाटे – २
बारीक चिरलेली कोथिंबीर – २ चमचे
लाल तिखट – ½ चमचा
काळी मिरी पावडर – ¼ चमचा
मीठ – चवीनुसार
कॉर्नफ्लोअर – २ चमचे
तेल – तळण्यासाठी
ग्रेव्हीसाठी:
तेल – २ चमचे
हिरव्या मिरच्या – २
आलं – १ तुकडा
लसूण – ४ पाकळ्या
उभा चिरलेला कांदा – २
टोमॅटो – २
काजू – १०
बदाम – ६
खडे मसाले (जिरे, लवंगा, वेलची, दालचिनी) – १ चमचा
हळद – ¼ चमचा
लाल तिखट – १ चमचा
गरम मसाला – ½ चमचा
मीठ – चवीनुसार
पाणी – आवश्यकतेनुसार
कसुरी मेथी – १ चमचा
क्रीम – २ चमचे

कृती
कोफ्त्यासाठी:
एका बाउलमध्ये गगनगिरी मलाई पनीर आणि उकडलेले बटाटे मॅश करून घ्या.
त्यात कोथिंबीर, लाल तिखट, काळी मिरी, मीठ आणि कॉर्नफ्लोअर घालून छान मळून घ्या.
मिश्रणाचे छोटे छोटे गोल कोफ्ते बनवा आणि हलकासा कॉर्नफ्लोअर लावून घ्या.
गरम तेलात कोफ्ते सोनेरी रंग येईपर्यंत तळून बाजूला ठेवा.
ग्रेव्हीसाठी:
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कांदा आणि टोमॅटो घालून परतून मऊ होऊ द्या.
हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या.
वाफवलेले काजू-बदाम वाटून वेगळी पेस्ट करून घ्या.
दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे व खडे मसाले घाला.
आता त्यात कांदा-टोमॅटो पेस्ट टाका, मग काजू-बदाम पेस्ट घालून छान परता.

त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ टाकून तेल सुटेपर्यंत परता.
आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून ग्रेव्हीची कंसिस्टन्सी सेट करा आणि वरून कसुरी मेथी टाका.
तयार तळलेले कोफ्ते बाउलमध्ये ठेवून त्यावर ही ग्रेव्ही ओता आणि शेवटी क्रीमने गार्निश करा.

Search