आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत एकदम easy, बिना ओव्हनचा, स्पॉंजी आणि स्वादिष्ट असा Jaggery Cake!
हा केक बनायला खूप सोपा आहे आणि साखरेऐवजी आपण Jaggery वापरत असल्यामुळे तो अधिक हेल्दी सुद्धा आहे.
तसंच Gagangiri दही वापरल्यामुळे Texture अगदी perfect आणि soft मिळतो!
साहित्य :
१ कप गगनगिरी दही
गुळ पावडर (Jaggery Powder)
सुर्यफूल तेल (Sunflower Oil)
व्हॅनिला इसेंस
काजू, बदाम आणि चॉकलेट चिप्स (टॉपिंगसाठी)
बेकिंग सोडा / बेकिंग पावडर
गावाचं पीठ / गव्हाचं पीठ
कृती:
सर्वात आधी एका बाउलमध्ये १ कप गगनगिरी दही घेऊन ते क्रीमसारखे मऊ होईपर्यंत मिक्स करून घ्या.
आता त्यात गुळ पावडर, व्हॅनिला इसेंस, सुर्यफूल तेल आणि थोडंसं दूध घालून नीट मिक्स करा.
नंतर गावाचं पीठ चालून घाला. त्यात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून सर्व एकत्र नीट मिसळा.
आता पॅनला बटर लावा, त्यावर बटर पेपर ठेवून पुन्हा वरून बटर लावा.
तयार केलेलं केकचं batter त्या पॅनमध्ये ओतून वरून काजू, बदाम आणि चॉकलेट चिप्स टाका.
गॅसवर मोठा पॅन गरम करून त्यावर हा केक असलेला पॅन ठेवा आणि झाकण ठेवून 40 ते 45 मिनिटे शिजू द्या.
केक थंड झाला की प्लेटवर काढून बटर पेपर अलगद काढा.