आज आपण बनवणार आहोत हेल्दी, चविष्ट आणि झटपट तयार होणारं दही तडका!
फक्त काही बेसिक मसाले आणि Gagangiri दही वापरून तयार करा हे सुपर टेस्टी आणि प्रोटीनयुक्त dish — जी गरम वाफाळणाऱ्या भातासोबत एकदम मस्त लागते.

साहित्य:
५०० ग्रॅम Gagangiri दही
१ टेबलस्पून बटर
१ टीस्पून मोहरी
१ टीस्पून जिरे
२-३ ड्राय रेड चिली
१ बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून Ginger-Garlic Paste
१ टीस्पून हळद पावडर
१ टीस्पून रेड चिली पावडर
मीठ चवीप्रमाणे
कोथिंबीर garnish साठी

कृती:
दही नीट क्रीमयी होईपर्यंत फेटून घ्या.
पॅनमध्ये बटर गरम करून मोहरी, जिरे, आणि लाल मिरच्या परता.
कांदा आणि Ginger-Garlic Paste घालून परता.
हळद, लाल तिखट आणि मीठ घालून मिक्स करा.
आता दही आणि कोथिंबीर टाकून नीट हलवा.
वरून कोथिंबीर garnish करून गरम भातासोबत सर्व्ह करा!

Search