तिरंगा राईस

रिपब्लिक डेच्या खास निमित्ताने आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि आकर्षक तिरंगा राईस पांढरा, केशरी आणि हिरवा रंग असलेला हा तिरंगा राईस बनवायला अतिशय सोपा असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल.या रेसिपीमध्ये वापरले आहे शुद्ध आणि सुगंधी गगनगिरी तूप, ज्यामुळे चव आणखी खास होते.

साहित्य
बासमती तांदूळ – 1 कप
पाणी – आवश्यकतेनुसार
मीठ – 1 चमचा
गगनगिरी तूप – 6 टेबलस्पून
इलायची पावडर – ½ चमचा
पिठीसाखर – 4 टेबलस्पून
बदाम – 8 ते 10 (कापलेले)
काजू – 8 ते 10 (कापलेले)
किसलेले खोबरे – 2 टेबलस्पून
ऑरेंज फूड कलर – आवश्यकतेनुसार
ग्रीन फूड कलर – आवश्यकतेनुसार

कृती
सर्वप्रथम एका कढईत पाणी घ्या. त्यात 1 चमचा मीठ आणि 2 टेबलस्पून गगनगिरी तूप घाला.
पाणी उकळल्यानंतर त्यात बासमती तांदूळ घालून चांगले शिजवून घ्या.
तांदूळ शिजल्यानंतर गाळून वेगळे ठेवा.
एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून गगनगिरी तूप घालून त्यात बदाम आणि काजू हलके भाजून घ्या.
दुसऱ्या पॅनमध्ये 2 टेबलस्पून गगनगिरी तूप घ्या. त्यात पांढऱ्या रंगासाठी थोडे शिजवलेले तांदूळ घाला.
त्यात इलायची पावडर आणि पिठीसाखर घालून नीट मिक्स करा.
आता आणखी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप घ्या.
त्यात पिठीसाखर, इलायची पावडर आणि ऑरेंज फूड कलर घालून मिक्स करा.
नंतर त्यात तांदूळ, भाजलेले काजू-बदाम आणि किसलेले खोबरे घालून केशरी राईस तयार करा.
याच पद्धतीने ग्रीन फूड कलर वापरून हिरवा राईस तयार करा.
शेवटी एका प्लेटमध्ये पांढरा, केशरी आणि हिरवा असे तिन्ही रंगांचे राईस व्यवस्थित लावा.

Search