मखाना खीर

 साहित्य

  • मखाना – आवश्यकतेनुसार
  • ॲक्टिव्ह काऊ मिल्क – आवश्यकतेनुसार
  • गगनगिरी तूप – आवश्यकतेनुसार
  • काजू – आवश्यकतेनुसार
  • बदाम – आवश्यकतेनुसार
  • साखर – चवीनुसार
  • वेलची पावडर – थोडीशी
  • किसलेले खोबरे – आवश्यकतेनुसार
  • पिस्ते – सजावटीसाठी

कृती

  1. एका पॅनमध्ये गगनगिरी तूप घेऊन त्यात मखाने घाला आणि ते कुरकुरीत होईपर्यंत कोरडे भाजून घ्या.
  2. त्याचप्रमाणे एका पॅनमध्ये गगनगिरी तूप गरम करून त्यात काजू आणि बदाम घाला. ते सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या.
  3. एका भांड्यात ॲक्टिव्ह काऊ मिल्क घेऊन ते चांगले उकळून घ्या.
  4. भाजलेले काही काजू आणि मखाने मिक्सरमध्ये घेऊन त्याची बारीक पावडर करून घ्या.
  5. आता उरलेले भाजलेले मखाने गगनगिरी तुपात घालून चांगले मिक्स करा.
  6. त्यामध्ये वेलची पावडर, चवीनुसार साखर, मखाना-बदामाची तयार केलेली पावडर आणि किसलेले खोबरे घाला.
  7. त्यात भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि थोडे गगनगिरी तूप घालून सर्व साहित्य चांगले मिक्स करा.
  8. तयार झालेल्या मखाना खिरीवर पिस्त्याने सजावट करा.
  9. पौष्टिक आणि स्वादिष्ट नवरात्री स्पेशल मखाना खीर गरम किंवा थंड सर्व्ह करा.
Search