दिवाळी स्पेशल बेसन बर्फी

साहित्य:

  • बेसन पीठ – 1½ वाटी
  • रवा – ½ वाटी
  • पिठीसाखर – ½ वाटी
  • Gagangiri तूप – 1 वाटी
  • केशर भिजवलेले पाणी – ½ वाटी
  • वेलची पावडर – ½ tsp
  • पिस्ता – गार्निशिंगसाठी
  • बदाम – गार्निशिंगसाठी

कृती:

  1. कढईत Gagangiri तूप गरम करून घ्या.
  2. त्यात बेसन पीठ आणि रवा घालून मंद आचेवर चांगले मिक्स करा.
  3. मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत हलवत भाजून घ्या.
  4. आता त्यात केशर भिजवलेले पाणी आणि पिठीसाखर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  5. शेवटी वेलची पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
  6. एका ट्रेमध्ये बटर पेपर लावून त्यावर पिस्ता आणि बदाम पसरवा.
  7. तयार केलेले बर्फीचे मिश्रण ट्रेमध्ये ओतून समान पातळीत पसरवा.
  8. बर्फी साधारण 30 मिनिटे सेट होऊ द्या.
  9. सेट झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार आकारात कट करून घ्या.
  10. तयार झालेली स्वादिष्ट बेसन बर्फी सर्व्ह करा.
Search