साहित्य:
- S.R. Thorat Gagangiri Paneer – आवश्यकतेनुसार
- शिमला मिरची – १
- कांदा – १
- मैदा – आवश्यकतेनुसार
- कॉर्नफ्लॉवर – आवश्यकतेनुसार
- हळद – १ टेबलस्पून
- गरम मसाला – १ टेबलस्पून
- लाल तिखट – १ टेबलस्पून
- मीठ – चवीनुसार
- पाणी – आवश्यकतेनुसार
- तेल – तळण्यासाठी
- टोमॅटो सॉस – सर्व्ह करण्यासाठी
- वूडन स्टिक्स – आवश्यकतेनुसार
कृती:
- Gagangiri Paneer, शिमला मिरची आणि कांदा छोटे तुकडे करून घ्या.
- एका बाऊलमध्ये मैदा, कॉर्नफ्लॉवर, हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घाला.
- त्यात थोडे पाणी घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घट्टसर बॅटर तयार करा.
- वूडन स्टिकवर शिमला मिरची, कांदा आणि पनीरचे तुकडे लावा.
- पॅनमध्ये तेल गरम करा. स्टिकवरील पनीर आणि भाज्या तयार केलेल्या बॅटरमध्ये व्यवस्थित डीप करून गरम तेलात सोडा.
- पनीर पकोड्यांना गोल्डन आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करा.
- तयार पकोडे टोमॅटो सॉस आणि गरम चहासोबत सर्व्ह करा.