साहित्य:
- बासमती तांदूळ – आवश्यकतेनुसार
- S.R. Thorat Gagangiri Malai Paneer – आवश्यकतेनुसार
- गाजर – कापलेले
- कांदा – कापलेला
- टोमॅटो – कापलेले
- लाल, हिरवी आणि पिवळी शिमला मिरची – कापलेली
- मटर – आवश्यकतेनुसार
- हिरवी मिरची – १–२
- लसूण – क्रश केलेला
- जिरे – आवश्यकतेनुसार
- Gagangiri Butter – आवश्यकतेनुसार
- हळद – १ टेबलस्पून
- पावभाजी मसाला – आवश्यकतेनुसार
- लाल तिखट – आवश्यकतेनुसार
- मीठ – चवीनुसार
- तेल – थोडे
- कोथिंबीर – गार्निशिंगसाठी
- Gagangiri Dahi – सर्व्ह करण्यासाठी
- पाणी – आवश्यकतेनुसार
कृती:
- कढईमध्ये पाणी घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि थोडे तेल घाला. पाणी उकळल्यानंतर स्वच्छ केलेला बासमती तांदूळ घाला.
- तांदूळ शिजल्यानंतर तो पाण्यातून वेगळा काढून बाजूला ठेवा.
- Gagangiri Malai Paneerचे तुकडे करून घ्या.
- पॅनमध्ये Gagangiri Butter घालून वितळवा. त्यात पनीरचे तुकडे घालून हलका गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करा आणि पनीर बाहेर काढून ठेवा.
- त्याच पॅनमध्ये जिरे, कांदा, क्रश केलेला लसूण आणि हिरवी मिरची घालून परता.
- त्यात गाजर आणि टोमॅटो घालून मिक्स करा आणि झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या.
- आता मटर, हळद, पावभाजी मसाला आणि लाल तिखट घालून व्यवस्थित परतून घ्या.
- चवीनुसार मीठ घालून लाल, हिरवी आणि पिवळी शिमला मिरची तसेच फ्राय केलेले पनीर घाला आणि मिक्स करा.
- त्यात शिजवलेला बासमती राइस घालून सर्व साहित्य हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करा.
- झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या.
- तयार तवा पुलाव प्लेटमध्ये काढून कोथिंबिरीने गार्निश करा आणि Gagangiri Dahi सोबत सर्व्ह करा.