दही मिसळ

साहित्य:

  • मोड आलेली मटकी – आवश्यकतेनुसार
  • Gagangiri Dahi – आवश्यकतेनुसार
  • किसलेले खोबरे – आवश्यकतेनुसार
  • कांदा – आवश्यकतेनुसार
  • टोमॅटो प्युरी – आवश्यकतेनुसार
  • आले-लसूण पेस्ट – आवश्यकतेनुसार
  • हिरवी मिरची – कापलेली
  • कढीपत्ता – आवश्यकतेनुसार
  • जिरे – आवश्यकतेनुसार
  • हळद – १ टेबलस्पून
  • लाल तिखट – चवीनुसार
  • गरम मसाला – आवश्यकतेनुसार
  • कांदा-लसूण मसाला – आवश्यकतेनुसार
  • बेसन – १ टेबलस्पून
  • तेल – आवश्यकतेनुसार
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – आवश्यकतेनुसार
  • फरसाण – सर्व्ह करण्यासाठी
  • पाव – सर्व्ह करण्यासाठी
  • लिंबू – सर्व्ह करण्यासाठी

कृती:

  1. कढईमध्ये पाणी घेऊन त्यात मोड आलेली मटकी, १ टेबलस्पून हळद आणि चवीनुसार मीठ घाला. मटकी शिजवून घ्या आणि तिचे पाणी वेगळे ठेवा.
  2. पॅनमध्ये किसलेले खोबरे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. त्यात कांदा आणि थोडे तेल घालून कांदा गोल्डन होईपर्यंत परता.
  3. दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लाल तिखट आणि गरम मसाला घाला.
  4. त्यात शिजवलेली मटकी घालून व्यवस्थित परता आणि वरून कोथिंबीर घाला. ही सुकी मटकी बाजूला ठेवा.
  5. आता दुसऱ्या कढईमध्ये थोडे तेल गरम करून जिरे, कांदा, आले-लसूण पेस्ट आणि कढीपत्ता घाला. त्यानंतर टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परता.
  6. त्यात कांदा-लसूण मसाला, लाल तिखट, मीठ, तयार केलेले खोबऱ्याचे वाटण आणि हळद घालून मिक्स करा.
  7. त्यात १ टेबलस्पून बेसन घालून थोडे परतून घ्या.
  8. आता शिजवलेल्या मटकीचे पाणी आणि थोडी मटकी घालून एक उकळी येऊ द्या.
  9. सर्व्हिंग प्लेटमध्ये सुकी मटकी, तयार केलेली मटकीची उसळ, Gagangiri Dahi, फरसाण, कांदा, लिंबू आणि कोथिंबीर घाला.
  10. पावासोबत गरमागरम सर्व्ह करा.

 

Search