साहित्य:
- S. R. थोरात गगनगिरी दही – आवश्यकतेनुसार
- बुंदी – आवश्यकतेनुसार
- जिरे पावडर – आवश्यकतेनुसार
- हिरव्या मिरच्या – बारीक चिरलेल्या
- कांदा – बारीक चिरलेला
- कोथिंबीर – गार्निशिंगसाठी
- मीठ – चवीनुसार
- पाणी – आवश्यकतेनुसार
कृती:
- एका बाउलमध्ये S. R. थोरात गगनगिरी दही घेऊन त्यात चवीनुसार मीठ घाला आणि दही छान व्हिस्क करून घ्या.
- त्यामध्ये थोडे पाणी घालून पुन्हा एकदा व्यवस्थित व्हिस्क करा.
- त्यात जिरे पावडर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा घाला.
- सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्या.
- त्यामध्ये बुंदी घालून हलक्या हाताने मिक्स करा.
- शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सुंदर गार्निश करा.
- थंडगार सर्व्ह करा.