साहित्य:
- S. R. थोरात गगनगिरी छास – आवश्यकतेनुसार
- बेसन पीठ – आवश्यकतेनुसार
- हळद – आवश्यकतेनुसार
- हिरवी मिरची – ग्राइंड केलेली
- हिंग – चिमूटभर
- मीठ – चवीनुसार
- तेल – फोडणीसाठी
- मोहरी – आवश्यकतेनुसार
- तीळ – आवश्यकतेनुसार
- हिरव्या मिरच्या – फोडणीसाठी
- कढीपत्ता – आवश्यकतेनुसार
कृती:
- एका बाउलमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात हळद, हिंग, चवीनुसार मीठ आणि ग्राइंड केलेली हिरवी मिरची घाला.
- त्यामध्ये S. R. थोरात गगनगिरी छास घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.
- तयार मिश्रण गाळणीमधून गाळून घ्या, जेणेकरून मिश्रण एकदम स्मूथ होईल.
- गाळलेले मिश्रण सॉसपॅनमध्ये घेऊन मंद आचेवर सतत व्हिस्क करत शिजवा.
- मिश्रण घट्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्या आणि त्याला हलकी वाफ येऊ द्या.
- तयार मिश्रण लगेच प्लेन सरफेसवर पातळ थरात पसरवा.
- मिश्रण थोडे सेट झाल्यावर त्याचे लांब पट्टे कापून घ्या आणि हलक्या हाताने रोल करा.
- फोडणीसाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, तीळ, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घाला.
- तयार फोडणी खांडवीवर सर्व बाजूंनी पसरवा.
- मऊ आणि टेस्टी छास खांडवी सर्व्ह करा.