ब्रेकफास्टसाठी वेळ कमी आहे? मग ही झटपट पण जबरदस्त टेस्टी गार्लिक ब्रेड रेसिपी नक्की करून बघा! गगनगिरी बटर, चीज आणि लसणाचा स्वाद घेऊन ५ मिनिटांत तयार होणारी ही गार्लिक ब्रेड तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नक्कीच आवडेल.
टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा आणि मजा करा!
साहित्य:
गगनगिरी बटर – २ चमचे
चीज – आवश्यकतेनुसार (ग्रेट केलेले)
लसूण – ५ ते ६ पाकळ्या (बारीक चिरलेले / स्मॅश केलेले)
कोथिंबीर – २ चमचे (बारीक चिरलेली)
चिली फ्लेक्स – १ चमचा
ब्रेड स्लाइसेस – ४
कृती:
पॅनमध्ये गगनगिरी बटर गरम करून त्यात लसूण टाका.
तो लसूण गोल्डन ब्राउन होईपर्यंत परता आणि बाहेर काढा.
हा लसूण स्मॅश करून परत बटरमध्ये मिक्स करा.
आता ब्रेड स्लाइस घ्या, त्यावर तयार लसूण-बटर स्प्रेड नीट लावा.
वरून चिली फ्लेक्स, कोथिंबीर आणि भरपूर चीज शिंपडा.
पॅनमध्ये स्लाइस ठेवा, झाकण ठेवून वाफ येऊ द्या.
चीज पूर्णपणे मेल्ट झाल्यावर गार्लिक ब्रेड तयार!