साहित्य:
- रवा – आवश्यकतेनुसार
- आंब्याचा रस – आवश्यकतेनुसार
- S. R. थोरात शक्ती मिल्क – आवश्यकतेनुसार
- S. R. थोरात गगनगिरी तूप – आवश्यकतेनुसार
- साखर – आवडीनुसार
- काजू – आवश्यकतेनुसार
- बदाम – आवश्यकतेनुसार
- इलायची पावडर – थोडीशी
- गुलाबाच्या पाकळ्या – गार्निशिंगसाठी
कृती:
- S. R. थोरात शक्ती मिल्क एका भांड्यात घेऊन छान गरम करून बाजूला ठेवा.
- कढईमध्ये गगनगिरी तूप घालून काजू आणि बदाम गोल्डन होईपर्यंत भाजून घ्या. भाजलेले ड्रायफ्रूट्स प्लेटमध्ये काढून ठेवा.
- त्याच कढईमध्ये रवा घालून मंद आचेवर छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्या.
- आंब्याचा रस मिक्सर जारमध्ये घेऊन स्मूथ होईपर्यंत ब्लेंड करून घ्या.
- भाजलेल्या रव्यात थोडे गगनगिरी तूप घालून मिक्स करा. त्यानंतर गरम केलेले दूध घालून व्यवस्थित एकत्र करा.
- त्यामध्ये इलायची पावडर आणि आवडीनुसार साखर घालून मिक्स करा.
- मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात ब्लेंड केलेला आंब्याचा रस घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करा.
- शेवटी भाजलेले काजू-बदाम घालून हलक्या हाताने मिक्स करा.
- तयार आंब्याचा शिरा प्लेटमध्ये सर्व्ह करून वरून काजू, बदाम आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी गार्निश करा.