केसरी शिरा रेसिपी

साहित्य:

  • रवा – 1 कप
  • साखर – 1 कप
  • S. R. थोरात शक्ती दूध – आवश्यकतेनुसार
  • S. R. थोरात गगनगिरी तूप – 4 टेबलस्पून
  • काजू-बदाम – कट केलेले
  • मनुके – आवश्यकतेनुसार
  • केशर – पाण्यात भिजवलेले
  • इलायची पावडर – ½ टीस्पून
  • पाणी – आवश्यकतेनुसार

कृती:

  1. एका पातेल्यात S. R. थोरात शक्ती दूध घेऊन ते गरम करून बाजूला ठेवा.
  2. पॅनमध्ये 1 टेबलस्पून S. R. थोरात गगनगिरी तूप घालून काजू-बदाम छान रोस्ट करून घ्या.
  3. त्याच पॅनमध्ये उरलेले 3 टेबलस्पून तूप घालून रवा मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्या.
  4. रवा छान भाजल्यानंतर त्यामध्ये गरम दूध आणि पाण्यात भिजवलेले केशर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  5. त्यामध्ये साखर, मनुके आणि इलायची पावडर घालून पुन्हा एकजीव करून घ्या.
  6. शेवटी रोस्ट केलेले काजू-बदाम घालून सर्व मिश्रण छान एकत्र करा.
  7. तयार केसरी शिरा प्लेटमध्ये सर्व्ह करून आवडीनुसार ड्रायफ्रूट्सने गार्निश करा.
Search