छास खांडवी

साहित्य:

  • S. R. थोरात गगनगिरी छास – आवश्यकतेनुसार
  • बेसन पीठ – आवश्यकतेनुसार
  • हळद – आवश्यकतेनुसार
  • हिरवी मिरची – ग्राइंड केलेली
  • हिंग – चिमूटभर
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – फोडणीसाठी
  • मोहरी – आवश्यकतेनुसार
  • तीळ – आवश्यकतेनुसार
  • हिरव्या मिरच्या – फोडणीसाठी
  • कढीपत्ता – आवश्यकतेनुसार

कृती:

  1. एका बाउलमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात हळद, हिंग, चवीनुसार मीठ आणि ग्राइंड केलेली हिरवी मिरची घाला.
  2. त्यामध्ये S. R. थोरात गगनगिरी छास घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.
  3. तयार मिश्रण गाळणीमधून गाळून घ्या, जेणेकरून मिश्रण एकदम स्मूथ होईल.
  4. गाळलेले मिश्रण सॉसपॅनमध्ये घेऊन मंद आचेवर सतत व्हिस्क करत शिजवा.
  5. मिश्रण घट्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्या आणि त्याला हलकी वाफ येऊ द्या.
  6. तयार मिश्रण लगेच प्लेन सरफेसवर पातळ थरात पसरवा.
  7. मिश्रण थोडे सेट झाल्यावर त्याचे लांब पट्टे कापून घ्या आणि हलक्या हाताने रोल करा.
  8. फोडणीसाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, तीळ, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घाला.
  9. तयार फोडणी खांडवीवर सर्व बाजूंनी पसरवा.
  10. मऊ आणि टेस्टी छास खांडवी सर्व्ह करा.
Search