साहित्य:
- मोड आलेली मटकी – आवश्यकतेनुसार
- Gagangiri Dahi – आवश्यकतेनुसार
- किसलेले खोबरे – आवश्यकतेनुसार
- कांदा – आवश्यकतेनुसार
- टोमॅटो प्युरी – आवश्यकतेनुसार
- आले-लसूण पेस्ट – आवश्यकतेनुसार
- हिरवी मिरची – कापलेली
- कढीपत्ता – आवश्यकतेनुसार
- जिरे – आवश्यकतेनुसार
- हळद – १ टेबलस्पून
- लाल तिखट – चवीनुसार
- गरम मसाला – आवश्यकतेनुसार
- कांदा-लसूण मसाला – आवश्यकतेनुसार
- बेसन – १ टेबलस्पून
- तेल – आवश्यकतेनुसार
- मीठ – चवीनुसार
- कोथिंबीर – आवश्यकतेनुसार
- फरसाण – सर्व्ह करण्यासाठी
- पाव – सर्व्ह करण्यासाठी
- लिंबू – सर्व्ह करण्यासाठी
कृती:
- कढईमध्ये पाणी घेऊन त्यात मोड आलेली मटकी, १ टेबलस्पून हळद आणि चवीनुसार मीठ घाला. मटकी शिजवून घ्या आणि तिचे पाणी वेगळे ठेवा.
- पॅनमध्ये किसलेले खोबरे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. त्यात कांदा आणि थोडे तेल घालून कांदा गोल्डन होईपर्यंत परता.
- दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लाल तिखट आणि गरम मसाला घाला.
- त्यात शिजवलेली मटकी घालून व्यवस्थित परता आणि वरून कोथिंबीर घाला. ही सुकी मटकी बाजूला ठेवा.
- आता दुसऱ्या कढईमध्ये थोडे तेल गरम करून जिरे, कांदा, आले-लसूण पेस्ट आणि कढीपत्ता घाला. त्यानंतर टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परता.
- त्यात कांदा-लसूण मसाला, लाल तिखट, मीठ, तयार केलेले खोबऱ्याचे वाटण आणि हळद घालून मिक्स करा.
- त्यात १ टेबलस्पून बेसन घालून थोडे परतून घ्या.
- आता शिजवलेल्या मटकीचे पाणी आणि थोडी मटकी घालून एक उकळी येऊ द्या.
- सर्व्हिंग प्लेटमध्ये सुकी मटकी, तयार केलेली मटकीची उसळ, Gagangiri Dahi, फरसाण, कांदा, लिंबू आणि कोथिंबीर घाला.
- पावासोबत गरमागरम सर्व्ह करा.