या दिवाळीत बनवा स्वादिष्ट, रसाळ आणि पारंपरिक गुलाबजामुन!
S.R. थोरात डेअरीच्या गगनगिरी खवा वापरून तयार केलेला हा गुलाबजामुन अगदी मऊ, सोनेरी आणि रसाळ लागतो.
कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांसाठी परफेक्ट स्वीट रेसिपी!
साहित्य:
५०० ग्रॅम S.R. थोरात गगनगिरी खवा
२ चमचे मैदा
५०० ग्रॅम साखर
वेलची पावडर
लिंबाचा रस
तेल (तळण्यासाठी)
पिस्ता (गार्निशसाठी)
कृती:
खवा आणि मैदा एकत्र मळून मऊ पिट तयार करा.
छोटे गोळे करून गुलाबजामुनचा आकार द्या.
साखरेचा पाक तयार करा आणि वेलची, लिंबाचा रस टाका.
गुलाबजामुन कमी गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
कोमट पाकात गुलाबजामुन टाका आणि पिस्ता ने सजवा.
या दिवाळीत गोडीत गोडवा आणा — गगनगिरी गुलाबजामुनसोबत!