साहित्य:
- Gagangiri Malai Paneer – 250 ग्रॅम
- Gagangiri Skimmed Milk Powder – ½ वाटी
- S.R. Thorat Shakti Milk – 1 कप
- Gagangiri तूप – 2 tbsp
- पिठीसाखर – ½ वाटी
- पिस्ता – गार्निशिंगसाठी
- बटर पेपर – आवश्यकतेनुसार
कृती:
- सर्वप्रथम Gagangiri Malai Paneer बारीक कापून मिक्सर जारमध्ये घ्या.
- त्यात Gagangiri Skimmed Milk Powder आणि 1 कप गरम केलेले S.R. Thorat Shakti Milk घालून बारीक आणि मऊ पेस्ट करून घ्या.
- पॅनमध्ये Gagangiri तूप गरम करून त्यात तयार केलेली Paneer पेस्ट घाला.
- मिश्रण सतत हलवत मंद आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवा.
- मिश्रण घट्ट झाल्यावर ते प्लेटमध्ये काढून त्यात पिठीसाखर घाला आणि व्यवस्थित मिक्स करा.
- एका प्लेटमध्ये बटर पेपर लावून त्यावर पिस्ता पसरवा.
- तयार केलेले मिश्रण त्यावर ठेवून समान पातळीत सेट करून घ्या.
- मिश्रण साधारण 30 मिनिटे सेट होऊ द्या.
- सेट झाल्यानंतर बटर पेपर काढून आपल्या आवडीनुसार बर्फीचे तुकडे कापून घ्या.
- तयार झालेली दिवाळी स्पेशल पनीर बर्फी सर्व्ह करा.