गणपती बाप्पाच्या आगमनात आपण नेहमी नवनवीन मोदक बनवतो. आज आपण खास शेंगदाणा मोदक बनवणार आहोत.
ही रेसिपी सोपी आहे आणि प्रसादासाठी परफेक्ट आहे.
साहित्य:
शेंगदाणे – १ वाटी
गूळ – १ वाटी
गगनगिरी तूप – २ चमचे
गगनगिरी स्किम्ड मिल्क पावडर – ½ कप
वेलची पूड – ½ चमचा
डेसिकेटेड कोकोनट – ½ वाटी
तीळ – २ चमचे
पिस्ता (गार्निशसाठी)
कृती:
शेंगदाणे, डेसिकेटेड कोकोनट आणि तीळ भाजून वाटून घ्या.
गगनगिरी तुपात गूळ कूक करून त्यात वेलची पूड आणि मिल्क पावडर घाला.
त्यात शेंगदाणे, नारळ व तीळ घालून मिक्स करा.
मोदक मेकर मध्ये पिस्ता टाकून तयार सारण भरून सुंदर मोदक बनवा.
लाडक्या बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि प्रसाद म्हणून सर्वांना द्या.