दिवाळी स्पेशल खुसखुशीत आणि क्रिस्पी भाकरवडी बनवून पाहा घरच्या घरी!
या रेसिपीत आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीने भाकरवडी कशी बनवायची – बाहेरून कुरकुरीत आणि आतून मसालेदार.
फक्त काही सोपी साहित्ये आणि थोडा वेळ, आणि तयार होईल परफेक्ट दिवाळी स्नॅक!

साहित्य:
डो साठी:
मैदा – 2 वाट्या
बेसन पीठ – 2-3 स्पून
ओवा – ½ चमचा
मीठ – चवीनुसार
तेल – आवश्यकतेनुसार
मसाल्यासाठी:
धने – 2 चमचे
जिरे – 1 चमचा
तीळ – 2-3 चमचे
डेसिकेटेड कोकोनट – 2-3 चमचे
हिंग – चिमूटभर
लाल तिखट – 1 चमचा
हळद – ¼ चमचा
साखर – 1 चमचा
मीठ – चवीनुसार
चिंचेची चटणी – आवश्यकतेनुसार

कृती:
एका भांड्यात मैदा, बेसन पीठ, ओवा, मीठ, आणि तेल टाकून चांगले मिक्स करा.
थोडे पाणी घालून घट्ट डो तयार करा आणि 10-15 मिनिटे रेस्टला ठेवा.
आता मसाल्यासाठी – धने, जिरे, तीळ आणि डेसिकेटेड कोकोनट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या.
त्यात हिंग, लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून मिक्स करा.
हा मसाला आणि साखर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या.
आता डोची पातळ चपटी लाटून साइडचे एजेस कापून घ्या.
त्यावर चिंचेची चटणी पसरवा आणि मसाला नीट पसरवा.
घट्ट रोल करून पाण्याने सील करा आणि छोटे-छोटे तुकडे करा.
गरम तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.
या दिवाळीत मस्त खुसखुशीत आणि क्रिस्पी भाकरवडीचा आनंद घ्या!

Search