दिवाळी स्पेशल गोड पदार्थांमध्ये आज बनवूया हेल्दी आणि चविष्ट खोया चॉकलेट बर्फी!
लहान मुलांची फेव्हरेट आणि पौष्टिक अशी ही बर्फी बनवायला अतिशय सोपी आहे.
या रेसिपीत वापरले आहे S.R. थोरात यांचे गगनगिरी खोया, गगनगिरी Skimmed Milk Powder, आणि शुद्ध कोको पावडर, ज्यामुळे चव आणि पौष्टिकता दोन्ही टिकतात.

साहित्य :
५०० ग्रॅम S.R. थोरात यांचे गगनगिरी खोया
१०० ग्रॅम साखर
वेलची पावडर – १ टीस्पून
२ टेबलस्पून गगनगिरी Skimmed Milk Powder
१ टेबलस्पून कोको पावडर
बदाम, पिस्ता आणि काजू – सजावटीसाठी
काजू पावडर – वरून भुरभुरण्यासाठी

कृती :
कढईत गगनगिरी खोया आणि साखर घाला.
त्यात वेलची पावडर टाकून हलक्या आचेवर नीट मिक्स करा.
मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर गगनगिरी Skimmed Milk Powder टाकून पुन्हा मिक्स करा.
आता कोको पावडर घालून चॉकलेटी मिश्रण तयार करा.
बटर पेपरवर बदाम, पिस्ता आणि काजू टाका.
तयार केलेले मिश्रण त्यावर पसरवा आणि समतल करा.
वरून काजू पावडर भुरभुरा.
अर्धा तास सेट होऊ द्या.
सेट झाल्यावर बटर पेपर काढा आणि हव्या त्या shape मध्ये कट करा.

Search