या दिवाळीत बनवा हेल्दी, प्रोटीनने भरपूर आणि तोंडात विरघळणारी पनीर बर्फी!
ही रेसिपी तयार होते Gagangiri Malai Paneer, Gagangiri Skimmed Milk Powder आणि S.R. Thorat Shakti Milk वापरून – ज्यामुळे मिळते नैसर्गिक चव आणि पौष्टिकता.
साहित्य :
गगनगिरी मलाई पनीर – १ कप (बारीक कापलेले)
गगनगिरी स्किम्ड मिल्क पावडर – २ चमचे
एस. आर. थोरात शक्ती मिल्क – १ कप (गरम केलेले)
गगनगिरी तूप – २ चमचे
पिठीसाखर – ½ कप
पिस्ता (गार्निशसाठी)
बटर पेपर – प्लेट सेट करण्यासाठी
कृती :
मिक्सर जारमध्ये गगनगिरी मलाई पनीर, स्किम्ड मिल्क पावडर आणि गरम केलेले एस. आर. थोरात शक्ती मिल्क घालून बारीक पेस्ट तयार करा.
पॅनमध्ये गगनगिरी तूप गरम करून त्यात तयार केलेली पेस्ट टाका आणि सतत हलवत रहा.
मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा आणि त्यात पिठीसाखर घालून नीट मिक्स करा.
प्लेटमध्ये बटर पेपर टाकून त्यावर पिस्ता पसरवा.
तयार मिश्रण त्यावर टाकून समान रीतीने पसरवा आणि अर्धा तास सेट होऊ द्या.
सेट झाल्यावर बटर पेपर काढा आणि हव्या त्या आकारात बर्फी कट करा.
आता तयार आहे दिवाळी Special हेल्दी आणि चविष्ट पनीर बर्फी!