घरच्या घरी बनवा ढाबा Style झणझणीत पनीर लाहोरी!
ही रेसिपी खूपच सोपी आणि स्वादिष्ट आहे – खास गगनगिरी मलाई पनीर आणि गगनगिरी दही वापरून.
तुमच्या किचनमधील मसाल्यांनी तयार होणारी ही डिश घरच्या घरी ढाब्यासारखी चवदार लागते.
साहित्य:
गगनगिरी मलाई पनीर – काप करून
गगनगिरी दही – ½ कप
टोमॅटो प्युरी – 1 कप
आलं-लसूण पेस्ट – 1 चमचा
कांदा – 1 (बारीक चिरलेला)
खडे मसाले – धने, जिरे, लवंग, काळे मिरे, वेलची, जावेत्री
पावडर मसाले – लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ
थोडी साखर
कोथिंबीर – सजावटीसाठी
तेल – आवश्यकतेनुसार
साहित्य:
पनीरचे काप करून त्यावर लाल तिखट, हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करा.
खडे मसाले (धने, जिरे, लवंग, मिरे, वेलची, जावेत्री) भाजून वाटून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून मॅरिनेट केलेले पनीर सोनेरी होईपर्यंत फ्राय करा.
दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून खडे मसाले, कांदा सोनेरी होईपर्यंत परता.
त्यात टोमॅटो प्युरी, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला घालून परता.
थोडं पाणी घालून झाकण ठेवून एक उकळी द्या.
आता त्यात वाटलेले मसाले, गगनगिरी दही आणि थोडी साखर घालून मिक्स करा.
शेवटी फ्राय केलेले पनीर टाका आणि वरून कोथिंबीर घालून सजवा.
झाले तयार! झणझणीत ढाबा Style Paneer Lahori.