व्हेज कोल्हापुरी तडका

साहित्य:

  • मिक्स भाज्या – 2 कप
  • कांदा – 2
  • टोमॅटो – 2
  • आलं-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • कोल्हापुरी मसाला – 1½ टेबलस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • तेल – 2 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर

कृती:

  1. कढईत तेल गरम करून कांदा परतून घ्या.
  2. आलं-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून शिजवा.
  3. हळद, लाल तिखट आणि कोल्हापुरी मसाला घालून परतून घ्या.
  4. मिक्स भाज्या आणि मीठ घालून थोडं पाणी टाका.
  5. झाकण ठेवून भाज्या मऊ होईपर्यंत शिजवा.
  6. गरम मसाला घालून 2 मिनिटे शिजवा.
  7. वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा
Search